Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मला आज इथपर्यंत येता आलं- शरद पवार

मुंबई | महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज वयाची 80 वर्ष पुर्ण केलीत. यानिमित्त आज मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी पवार यांनी सर्व जनतेचे आभार मानले आहेत.

मी गेल्या 50 वर्षापासून राजकारणात काम करत आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेने ही संधी दिली म्हणून मला आज इथपर्यंत येता आलं असल्याचं शरद पवार म्हणाले. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये ते बोलत होते.

फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही.  त्यांनी दिलेल्या दृष्टीतून समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.  फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचं आवाहन पवारांनी केलं आहे.

दरम्यान, पाण्यापासून वीज निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विज्ञानाचा आधार केला. ज्योतिबांना आपण महात्मा मानतो की, त्यांनी विज्ञानाचा आधार घेतला. त्यामुळे आपणही त्या विचारांची पिढी तयार करावी, असंही पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो त्यांच्याकडे नेहमी…- अमृता फडणवीस

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

‘देवेंद्र.. जीवनात मोठं व्हायचं असेल तर…’; फडणवीसांनी सांगितला मुंडेंनी दिलेला कानमंत्र

शेतकऱ्यांनो कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

धक्कादायक!; पुण्यातील भाजप आमदाराच्या घरात मोठी चोरी, इतक्या लाखाचे दागिने लंपास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या