बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खेळासाठी कायपण… म्हणून ‘हा’ क्रिकेटपटू म्हणाला विमान नको, मी कारनेच जाणार!

मुंबई |  भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी कारमधून 700 किलोमीटरचा प्रवास केला आहे. शनिवारी, 27 फेब्रुवारी रोजी के. एल. सैनी मैदानावर होणाऱ्या सामन्यापूर्वी शार्दुलने अहमदाबाद ते जयपूर असा कारने प्रवास केला. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आणि बायो बबलमध्ये जाण्यासाठी शार्दुल ठाकूरने हा प्रवास केला.

कोरोनामुळे देशात प्रवासावर निर्बंधआहेत. शार्दुल ठाकूर अहमदाबादवरून विमानाने 80 मिनिटात जयपूरला पोहोचू शकला असता, मात्र विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी 10 तासांचा प्रवास करण्याचा निर्णय त्याने घेतला. जर त्याने विमानाने प्रवास केला असता तर मुंबईच्या टीममध्ये सामील होण्याआधी त्याला काही दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं असतं, त्यामुळे शार्दुलने कारने जायचा निर्णय घेतला.

‘२२ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता शार्दुल ठाकूर आपली कार घेऊन निघाला. तो लवकर आल्यामुळे त्याच दिवशी टीमशी जोडला गेला आणि त्याच दिवशी त्याने सरावालाही सुरूवात केली. तो खेळासाठी आणि टीमसाठी किती समर्पित आहे, हे यातून दिसतं’, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिन संजय नाईक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आधी शार्दुलची निवड झाली होती, मात्र उमेश यादवने फिटनेस टेस्ट पास केली, त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संधी देण्यात आली व विजय हजारे चषक खेळण्यासाठी शार्दुलला रिलीज करण्यात आलं.

थोडक्यात बातम्या-

“मी त्यांना वाघ म्हणणार नाही, संत म्हणतो… संत संजय राठोड लगे रहो!”

मजबुरी का नाम उद्धव ठाकरे!; “मंत्र्याची हकालपट्टी करण्यापासून कोण रोखत आहे?”

“मी ठरवेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण, या अहंकारात मंत्रिमंडळ”

‘टाईमपास’मधील प्राजूचा ग्लॅमरस अंदाज! पहा फोटो…

“मुख्यमंत्री बलात्काऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेनं झोडलं पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More