बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आला रे आला ‘लॉर्ड शार्दुल’ आला! ‘या’ खेळाडूच्या बदल्यात विश्वचषक संघात शार्दुलची एन्ट्री

नवी दिल्ली | आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेला 17 ऑक्टोबर पासून सुरूवात होत आहे. विश्वचषक सामन्यासाठी भारतीय संघाची अगोदरच घोषणा करण्यात आली आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात बदल केलं आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला अंतिम 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आलं आहे.

निवडकर्त्यांना असं वाटतं की, शार्दुल ठाकूर एक वेगवान गोलंदाज आहे आणि सध्या हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नाही. त्यांना मुख्य संघात एक अष्टपैलू खेळाडू हवा होता. त्यामुळे अक्षर पटेल संघात कायम आहे आणि रवींद्र जडेजा जखमी झाला तर तो पुन्हा मुख्य संघात परत येईल. जड्डू खेळत नाही तोपर्यंत अक्षरची गरज भासणार नाही, अशी माहिती पीटीआयला निवड समितीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात शार्दूलने अफलातून अष्टपैलू खेळाडूचा नजराणा दाखवला. ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामन्यात देखील शार्दुलने सगळ्यांना अचंबित केलं होतं. चेन्नई सुपरकिंग्ज सध्या जोरदार फार्ममध्ये असून आयपीएल 2021 मध्ये त्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळेच शार्दुलची निवड केली असल्याचं समजत आहे.

दरम्यान, तसेच बीसीसीआयने भारतीय संघासोबत विश्वचषकाच्या सराव सामन्यासाठीच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाल, व्यंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद आणि के गौतम या खेळाडूंचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

…तर 30 आमदारांचे तिकीट कापणार; भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा इशारा

“कुणीही येईल आणि तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल”

सचिनच्या लेकीचा फोटो, अभिनेत्याचा एक लाईक अन् नव्या चर्चांना उधाण

“ज्यांची बुद्धी कमी असते, त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More