कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार का? वाचा सविस्तर

Share Market Holiday l कृष्ण जन्माष्टमीचा सण 26 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त अनेक कार्यालये आणि शाळांना सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत सोमवारी शेअर बाजारात व्यवहार होईल की नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर आज आपण या प्रश्नच उत्तर आपण जाणून घेऊयात…

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुट्टी असणार? :

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच 26 ऑगस्टला शेअर बाजार खुला राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वेळेवरच उघडणार आहेत. त्यामुळे तुम्ही सहजपणे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.

शेअर बाजारात दर आठवड्याला पाच दिवस व्यवहार होतात. शनिवार आणि रविवारी बाजार बंद असतो. या दिवशी कोणत्याही प्रकारचा व्यापार होत नाही. साप्ताहिक सुटी व्यतिरिक्त राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सणांच्या निमित्ताने बाजारपेठ बंद राहते. ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र जन्माष्टमीनिमित्त बाजारपेठेत सुट्टी असणार नाही.

Share Market Holiday l या वर्षी बाजार कधी बंद राहणार? :

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या सुट्टीच्या यादीनुसार, 2024 च्या उर्वरित महिन्यांत स्टॉक मार्केट फक्त 4 दिवस बंद राहील. तर आज आपण जाणून घेऊयात शेअर मार्केट हॉलिडे लिस्ट

– 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बाजारपेठेत सुट्टी असेल.
– दिवाळीनिमित्त 1 नोव्हेंबर रोजी बाजारपेठ बंद राहणार आहे. मात्र, दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजार उघडतो.
– गुरुनानक जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी बाजारपेठेत सुट्टी असते.
– नाताळच्या निमित्ताने 25 डिसेंबर रोजी बाजारपेठ बंद राहणार आहे.

शेवटच्या सत्रातील बाजाराची स्थिती काय होती? :

शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच 23 ऑगस्ट 2024 रोजी (शुक्रवार) शेअर बाजार मर्यादित मर्यादेत बंद झाला. सेन्सेक्स 33 अंकांच्या वाढीसह 81,086.21 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 11.65 अंकांच्या वाढीसह 24,823.15 अंकांवर पोहोचला होता.

News Title – Share Market Holiday

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र हादरला! पुन्हा एका मुलीवर बलात्कार

राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, आदित्य ठाकरेंविरोधात टाकला मोठा डाव?

पुणेकरांनो सावधान! तब्बल ‘इतके’ दिवस जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

“आरोपीला फाशी होईपर्यंत..”; भर पावसात सुप्रिया सुळे महायुती सरकारवर कडाडल्या

सोनं, चांदी झाली स्वस्त! जाणून घ्या आजचे दर