बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबई | एकीकडे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच राकेश झुनझुनवाला यांच्या इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स या कंपनीच्या शेअर्सच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉकचा भाव वधारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स शेअरचा दर गेल्या काही दिवसात कमी होत असल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु आता या शेअर्सच्या किमती तब्बल 13 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शेअर बाजारात सतत चढ-उतार होत असतात. त्यातच तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स या कंपनीच्या शेअर्सच्या दरात वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कंपनीच्या प्रवर्तकांनी आपली भागीदारी ही 10 टक्क्यांनी कमी केली आहे. तसेच ब्रिकवर्क रेटींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने इंडिया बूल्सचं रेटिंग स्थिर केलं आहे, पूर्वी हे रेटींग नकारात्मक होतं.

परंतु 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी भागीदारी करणार असल्याच्या वृत्तावर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. शिवाय 13 टक्‍क्‍यांनी झुनझुनवाला यांच्या शेअरची वाढ झाल्याने हा शेअर खरेदी करणाऱ्या शेअर होल्डरमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

महाराष्ट्रातील कोरोना आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

मैदानात घातला पंचाशी वाद! ‘या’ भारतीय खेळाडूवर कारवाईची शक्यता

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More