बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झुनझुनवालांना जोर का झटका! ‘या’ शेअर्समुळे फक्त 10 मिनिटात गमावले 318 कोटी

मुंबई | शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करून अगदी काही वेळात आणि कमी रूपयांमध्ये श्रीमंत झालेल्यांची संख्या कमी आहे. पण नुकसान झालेल्यांची संख्या मात्र जास्त असते. आपल्या अचुक आणि नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या जोरावर भारतीय शेअर बाजारात रूबाबात घौडदौड करण्यात राकेश झुनझुनवाला (Rakesh JhunJhunwala) यांचं नाव आघाडीवर आहे. अशातच झुनझुनवाला यांना मोठा धक्का बसला आहे.

जागतिक घडामोडींचा परिणाम थेट शेअर बाजारावर होत असतो. अगदी तसाच परिणाम शेअर बाजारावर  झाल्यानं राकेश झुनझनवाला यांना फार मोठं नुकसान झालं आहे. निफ्टी आणि सेनसेक्सने आज निराशजनक कामगिरी केली आहे. निफ्टी 200 अंकानी तर सेंसेक्स 800 अंकानी कोसळला आहे. याचा थेट फटका राकेश झुनझुनवाला यांच्या शेअरला बसला आहे.

टायटन कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीचे शेअर आहेत. या घसरणीचा त्यांना जोरदार फटका बसला आहे. त्यांना फक्त 10 मिनिटांमध्ये तब्बल 318 करोड रूपयांचं नुकसान झालं आहे. या कंपनीत झुनझनवाला दांम्पत्याचे तब्बल 4 कोटी 33 लाख 970 शेअर्स आहेत. टायटनच्या शेअर्संनं आज 73.60 रूपये प्रतिशेअर घसरण नोंदवली आहे. याचा फटका झुनझुनवाला यांना बसला आहे.

दरम्यान, राकेश झुनझुनवाला हे नाव भारतीय शेअर बाजारातील एक मोठं नावं आहे. त्यांना बीग बुल या नावानं सुद्धा ओळखण्यात येतं. सध्या ते आपल्या अकाई या विमानसेवेच्या सुरूवातीची तयारी करत आहेत. राकेश झुनझुनवाला यांना हा असा मोठा फटका बसल्यानं छोटे गुंतवणुकदार चिंतेत आहेत.

थोडक्यात बातम्या 

नाथाभाऊंनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; तब्बल 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“कदाचित मी पहिलाच मंत्री असेल ज्याने…”, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा

“हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दांचा अर्थ भाजपला कळत नाही”

“युतीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रस्ताव”, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

OBC Reservation! निवडणूक आयोगाचा ठाकरे सरकारला मोठा दणका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More