बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैसा वसूल शेअर! वर्षभरात तब्बल 184 टक्क्यांनी वाढला ‘या’ कंपनीचा शेअर

मुंबई | शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांचं प्रमाण सध्या वाढलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये साखर उद्योगाशी संबंधीत कंपान्यांच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. धामपूर शुगर मिल्स लिमिटेड देखील अशीच कंपनी आहे.

गेल्या वर्षभरात धामपूर शुगर मिल्सचे (Dhampur Sugar Miles) भाव 185 रूपयांनी वाढून 525 रूपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात तब्बल 184 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील दहा वर्षात कंपनी आपल्या शेअर्स धारकांना चांगला परतावा देत आहे.

एका व्यक्तीनं धामपूर मिल्समध्ये वर्षभरापूर्वी एक लाखाची गुंतवणूक केली असेल तर त्याच्या शेअर्सचे मुल्य आता 2.84 लाख असेल. जवळपास दुप्पटीपेक्षा अधिक फायदा वर्षभरात झाला आहे. परिणामी गुंतवणूकदार धामपूर मिल्समध्ये गुंतवणूक करत आहेत.

दरम्यान, साखर कारखान्यांच्या उपपदार्थांच्या उत्पादनांमुळं शेअर बाजारात कंपन्या नफा कमवत आहेत. इथेनाॅल धोरण लागू झाल्याचा फायदा होणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल

तालिबानचा नवा फतवा! आता महिला-पुरूषांना उद्यानात सोबत फिरण्यास बंदी

मुलींची ‘ही’ पाच सिक्रेट मुलांना माहित असावी, नक्कीच होईल फायदा

शाळकरी मुलांसाठी शिक्षण विभागानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More