बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्तनपान करतानाचा फोटो शेअर करत ‘ही’ बडी अभिनेत्री म्हणाली…

मुंबई | अनेक बडे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. सोशल मीडियावर हे कलाकार चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील कडू गोड आठवणी शेअर करताना दिसतात. मात्र, काहीवेळा कलाकारांना या पोस्टमुळे सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. सध्या अशाच ट्रोलिंगचा सामना बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिला करावा लागत आहे.

सेलिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा 9 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सेलिना तिच्या मुलाला स्तनपान करताना दिसत आहे. 9 वर्षांपूर्वी या फोटोमुळे सेलिनाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं. सेलिनाने 9 वर्षांनंतर हा फोटो शेअर करत आपल्याला त्यावेळी नेमकं का ट्रोल करण्यात आलं होतं, हे अद्याप समजलं नसल्याचं म्हटलं आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवर स्तनपानाचा फोटो शेअर करत सेलिना म्हणाली की, 9 वर्षांपूर्वी स्टारडस्ट मासिकाच्या इंडिया आवृत्तीसाठी हा फोटो काढण्यात आला होता. हा फोटो शेअर करताना मी माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण शेअर करतेय, असं मला वाटत होतं. मात्र, मला वाईट प्रकारे ट्रोल केलं गेलं. यामुळे मला खूप वाईट वाटलं.

मला अजून देखील समजत नाही, की मला ट्रोल का केलं गेलं? जर तुमचं वजन वाढलं असेल तर तुम्हाला ट्रोल केलं जाऊ शकतं. जर तुमच्या मुलाने मोकळेपणाने तुम्हाला लाथ मारली असेल तर तुम्ही त्याला निष्काळजीपणा म्हणाल का? मी जर कोणती गोष्ट केली तर त्यासाठी कोणाला विचार करण्याचा हक्क खरंच आहे का? असे देखील सवाल सेलिनाने या पोस्टमध्ये विचारले आहेत.

थोडक्यात बातम्या –

बाबो! हाॅकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यास ‘हे’ सरकार प्रत्येक खेळाडुला देणार एवढे कोटी रूपये

रिलायन्स जियोने आणला सर्वात स्वस्त धमाकेदार प्लान; वाचा सविस्तर

“मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाय अन् आता परत आलाय”

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूलीबाबत उर्जामंत्र्यांचे ‘हे’ आदेश

पतीच्या बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् घडला अनपेक्षित प्रकार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More