बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कब तक छीपोगे गोहाटीमे’; झिरवळांचा फोटो शेअर करत राऊतांनी आमदारांना डिवचलं

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीने संपुर्ण महाराष्ट्राला हलवून सोडला. एक-एक करत अनेक आमदार आणि आणि मंत्री शिंदेच्या गोटात गेले आहेत. जीव गेला तरी शिवसेना सोडणार नाही असे म्हणणारे सुद्धा शिवसेना सोडून पळाले आहेत. यावर आता शिवसेनेची तोफ बोलले जाणारे खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास भाषेत टिकास्त्र सोडलं आहे.

‘कब तक छीपोगे गोहातीमे…, आना ही पडेगा चौपाटीमे’ असे खोचक ट्विट करत त्यांनी बंडखोर आमदारांना धारेवर धरत मुंबईत येण्याचे आव्हान केले आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा फोटो देखील टाकत बंडखोरांना डिवचले आहे. शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरावाचं पत्र दिले होते. ती मागणी फेटाळून लावत, शिंदे गटाला मविआ सरकारने मोठा धक्का दिला आहे.

संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा खरपुस समाचारही घेतला. त्यांनी बंडखोर आमदारांना ‘डुकरं’ असे संबोधले आहे. राऊत म्हणाले, गुवाहाटीत डुकरं फार आहेत, त्यात इकडची चाळीस डुकरे तिकडे गेली आहेत. हिंमत होती तर पाय लाऊन पळून का गेलात? गुवाहाटीत कामाक्षी देवीचं मंदिर आहे. तिकडे रेड्यांचा बळी देतात, डुकरांचा नाही. डुकरांचा बळी आपल्याला महाराष्ट्रात द्यायचा आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, आम्ही बंडखोरांना दोन दिवस समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यांना मुंबईत येण्याचे आव्हान केले. मात्र त्यांनी एकले नाही. आता शिवसेनेची दारं त्यांना बंद झाली आहेत. शिवसेनेला ज्या पक्षाने संपविण्याचा विडा उचलला आहे, त्यांच्या मांडीला मांडी लाऊन तुम्ही बसता? असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.

थोडक्यात बातम्या – 

संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

‘यावर्षी योग्य माणसाच्या हस्तेच विठ्ठलाची पूजा’; भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य

मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

एकनाथ शिंदे दारुच्या नशेत?; ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More