बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पु.ल.देशपांडे यांची ‘ती’ व्हिडीओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी दिला महत्वाचा सल्ला

मुंबई | आपल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे मुंबई पोलीस कायमच चर्चेत असतात. आता मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरुन लॉकडाऊनमध्ये लोकांनी बाहेर पडू नये यासाठी पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी महाराष्ट्राचे लाडके लेखक पु.ल.देशपांडे यांच्या भाषणातील एक क्लिप शेअर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट करत पु.ल देशपांडे यांची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली. त्यात पु.ल.देशपांडे म्हणतात “…त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी तिथे सुखी राहा, आयुष्यात सगळ्याच महत्त्वाकांक्षा काही पुऱ्या होत नाहीत”, असं पु.ल.देशपांडे एका फाऊंटनच्या व्याख्यानमालेत म्हणाले होते. या ट्विटमधून महाराष्ट्र पोलिसांनी घरी राहण्याचं आवाहन केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात आवश्यकता नसताना बाहेरगावी फिरण्याचे प्लॅन बनवणाऱ्या महत्वाकांक्षी ‘वल्लींना’, जबाबदार नागरिक हेच म्हणतात, असा मथळा या ट्विटला महाराष्ट्र पोलिसांनी दिला आहे.पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्यातलं एक मोठं नाव आहे. पु.ल.देशपांडे यांना सर्वजण ‘भाई’ म्हणायचे. तर काहीजण त्यांना त्यांच्या हसमुख स्वभावामुळे ‘वल्ली’ देखील म्हणतं असत.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही कोरोनापासून दूर राहण्यासाठी घराबाहेर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी ट्विटरवर टाॅम अॅण्ड जेरी या लोकप्रिय कार्टूनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे ‘या’ भाजप आमदाराचं निधन; आतापर्यंत 4 भाजप आमदार कोरोनाचे बळी

‘…तर मराठा समाज भाजप खासदारांना बघून घेईल’; हर्षवर्धन जाधवांची संतप्त प्रतिक्रिया

“ती 40 पैशांची मोकाट गुरं सरकारची जावई आहेत का?”

तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात गांधी आणि नेहरू घेणार मंत्रिपदाची शपथ

“आम्हाला दोनवेळा निवडून दिलंय, आम्हाला जनतेची काळजी आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More