Top News महाराष्ट्र मुंबई

‘त्यांना चपलेने मारायचं’; जुना व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई | औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झालं नसल्यानं भाजप, मनसे यांच्याकडून टीका करण्यात येत आहे.

औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमचा विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी ट्विटवर आदित्य ठाकरेंचा औरंगाबादमधील भाषणाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतराबाबत भाष्य केलं आहे

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी संभाजीनगर न बोलता औरंगाबाद म्हटलं की त्यांना चपलेनं मारायचं. त्यांना शेण खायायची सवय आहे, असं आदित्य ठाकरे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

‘…तर महाराष्ट्राचंही नामांतर करा’; या नेत्याची राज्य सरकारकडे मागणी

‘ही तर टाटा, बिर्लांची सेना’; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, म्हणाले…

शिवबंधन सोडत ‘या’ शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या