बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

मुंबई | सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय असेलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता. मुनमुन नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. अशातच सध्या ती टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत याच्या रिलेशनशीपच्या अफवांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

मुनमुन दत्ता आणि अभिनेता राज अदनान यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहे. यावर आता मुनमुननं प्रतिक्रिया दिली आहे. एक पोस्ट शेअर करत आता तिनं यावर संताप व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये मुनमुननं म्हटलं आहे की, मला भारताची मुलगी असल्याची लाज वाटत आहे.

एवढंच नाहीतर तिनं पुढे म्हटलं की, बातम्यांच्या नावाखाली तुम्हाला कोणी काल्पनिक, मनाने बनवलेल्या गोष्टी टाकायचा हक्क दिला. एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा मग प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढतात, हे सगळं फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता. तुम्हाला हवं ते टाकत कोणाच्याही प्रतिष्ठाला धक्का लावू शकता. तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे.

दरम्यान, आता मुनमुननंतर राजनही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सध्या हा विषय सोशल मीडियावर खूप चर्चेत आला असून यावर अनेक प्रतिक्रियाही येताना दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

छोट्या कियाराचा सोशल मीडियात धुमाकूळ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मोठी बातमी! किंग कोहली कर्णधारपदावरून होणार पायउतार?, ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयची नजर

“भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती, पण मी पैसे न घेता पक्षात आलो”

रहाटणीतील ‘लेगसी ऑरा’ चा अनोखा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More