बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हिडीओ शेअर करत प्रियंका चोप्राने दिली गुड न्यूज!

मुंबई | बाॅलिबूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने तीच्या अभिनयाच्या जोरावर हाॅलिवूडमध्ये सुद्धा तीची ओळख बनवली आहे. एवढचं नाही तर हाॅलिवूड सिंगर निक जोनस सोबत प्रियंकाने लग्न गाठ बांधली आहे. प्रियंका आणि तीचा पती निक हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकताच प्रियंकाने तीच्या सोशल मिडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमधून तीने तीच्या चाहत्यांना खूश खब्बर दिली असून या व्हीडिओमध्ये निक सुद्धा तीच्या सोबत आहे.

येणाऱ्या 93 व्या ऑस्कर अवाॅर्ड शोमध्ये प्रियंका नाॅमिनेशन्सची घोषणा करणार असल्याचं तीने या व्हीडिओमधून सांगितलं आहे. व्हीडिओमध्ये केलेल्या वक्तव्यानुसार प्रियंका ऑस्कर नामांकन जाहीर करणार असून नाॅमिशन्सची देखील घोषणा करणार आहे. एवढचं नाही तर सगळ्यांनी त्यांना लाईव्ह पाहवे, असं सुद्धा तीने म्हटलं आहे.

जगप्रसिद्ध असलेला हा ऑस्कर अवाॅर्ड शो दोन भागात प्रेझेंट केला जाणार आहे. या नाॅमिनेशन्सचं प्रसारण Oscars.com, Oscars.org आणि सोशल मिडियावर लाईव्ह होणार आहेत. ह्या व्हीडिओला शेअर करत प्रियंकाने द अक्याडमी या अकाऊंटला टॅग केलं आहे. एवढचं नाही तर ती एकटी ही घोषणा करेल का?, असा सवाल विचरुन ती मसकरी करत असल्याचं तीनं पुढ म्हटलं आहे.

दरम्यान, जगप्रिद्ध असलेला ऑस्कर अवाॅर्ड दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात पार पडतो. मात्र जगभर चालू असलेल्या कोरोना आजारामुळे हा शो पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हे पुरस्कार २८ एप्रिलला आयोजित करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ‘द व्हाईट टाईगर’ या चित्रपटातून प्रियंका दोन नामांकन घोषित करु शकते.

थोडक्यात बातम्या-

“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘या’ ठिकाणी घेतली कोरोनाची लस

मोठी बातमी! कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लॉकडाऊनची घोषणा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More