बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रोहित सरदाना खोटारडा होता, तो कुणाच्याही लक्षात राहणार नाही”

नवी दिल्ली | आज तक या वृत्तवाहिनीचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दु:खद निधन झालं आहे. रोहित सरदाना यांच्या जाण्यानेदेश सुन्न झाला असून मीडिया विश्वास शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल माध्यमांवरून सरदाना यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र शरजील उस्मानीने रोहित सरदाना यांच्या मृत्युची बातमी समजल्यावर त्याने वादग्रस्त ट्विट केलं आहे.

रोहित सरदाना समाजविरोधी, मनोरुग्ण खोटारडा, नसंहाराचे समर्थन करणारा होता. तो पत्रकार म्हणून आठवणीत राहणार नाही, असंशरजील उस्मानीने म्हटलं आहे. याबाबत त्याने ट्विट केलं आहे.

रोहित सरदाना यांच्यावर उपचार चालु होते तेव्हाही इतरांची काळजी करत होेेते आणि मदत करत होते. कारण त्यांचे शेवटचे जे तीन ट्विट आहेत त्यावरून तरी हेच लक्षात येतं. कोरोनाची लागण झाल्यावर रोहित सरदाना हे दिल्लीतूल मेट्रो रूग्णालयात उपचार घेत होते. एकीकडे कोरोनाशी झुंज देत होेते तर आपल्या परीने लोकांची मदतही करत होते.

दरम्यान,  काल रात्री त्यांची तब्येत स्थिर होती पण त्यानंतर सकाळी 4 वाजता अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि आज सकाळी त्यांचं हृदयविकाराचा झटका आल्याने दु:खद निधन झालं.

 

थोडक्यात बातम्या- 

#सकारात्मक_बातमी | श्रीगोंद्यातील दोघा आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

“भारतासोबत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये”, बिल गेट्स यांचं धक्कदायक वक्तव्य

इंदोरीकर महाराजांनी सांगितला कोरोनातून वाचण्याचा ‘हा’ खास उपाय

दिलदार गब्बर! मिशन ऑक्सिजनसाठी केलेली मदत ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

ATM सेंटरमधलं CCTV फुटेज व्हायरल, ‘या’ माणसाचा कारनामा पाहून सारेच हैराण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More