“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?

Sharmila Tagore | सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी क्रिकेटर मन्सूर अली खान यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना सैफ अली खान आणि सोहा अली खान अशी दोन मुले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शर्मिला टागोर यांनी मुलगा सैफबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

या दोन-चार दिवसांत सैफ आणि करीनाच्या नात्याबद्दल चर्चा झाल्या. करीनासोबत सैफचे संबंध बिघडल्याचंही बोललं गेलं. इतकंच काय तर, सैफ तिसरी बायको आणण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा होती. अशात करीनाची सासू तथा सैफची आई शर्मिला टागोर यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

‘मदर्स डे’निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या त्यांच्या आई होण्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.त्यांनी सैफच्या जन्मानंतरच्या आठवणी जागृत केल्या. मुलासोबत पुरेसा वेळ व्यतित करू न शकल्याची खंत त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली.

काय म्हणाल्या शर्मिला टागोर?

“जेव्हा सैफचा जन्म झाला, तेव्हा मी खूप कामात होते. एका दिवसात मी दोन शिफ्टमध्ये काम करत होते. त्याच्या आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षांत मी त्याच्यापासून लांबच होते. एक आई म्हणून माझ्या ज्या जबाबदाऱ्या होत्या, त्या मी पूर्ण केल्या होत्या. मी त्याच्या शाळेत पालकांच्या मिटींगसाठी जायचे, त्याच्या विविध कार्यक्रमांना मी उपस्थित राहायची. पण त्याच्यासाठी मी कधीच फुल-टाइम आई नव्हती.”, असं शर्मिला टागोर यांनी सांगितलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “माझे पती सैफसोबत होते, पण मी नव्हती. नंतर जेव्हा माझ्यातील मातृत्व जागृत झालं, तेव्हा मी खूपच उत्साही आई बनले. त्याला जेवण भरवणं, अंघोळ घालणं या सर्व गोष्टी मला करायच्या होत्या. ही नाण्याची दुसरी बाजू होती. पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मी काही चुका केल्या आहेत.”,असा खुलासा यावेळी शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केला.

दरम्यान, शर्मिला टागोर यांची ही मुलाखत तशी जुनी असली तरी ती आता चर्चेत आली आहे. सैफचे दोन लग्न झाले आहे. त्याचं पहिलं लग्न हे अमृता सिंहसोबत झालं. त्यांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. नंतर त्याने अमृता सोबत घटस्फोट घेत अभिनेत्री करीना कपूर सोबत संसार थाटला. करीनापासून त्याला दोन मुले आहेत.

News Title – Sharmila Tagore opens up about Saif Ali Khan

महत्त्वाच्या बातम्या-

कोवॅक्सिन लसीने चिंता वाढवली; नागरिकांमध्ये आढळतायेत हे गंभीर आजार

“आई-वडिलांच्या भांडणांमुळे शाळेत लाज..”; रणबीर कपूरने केला खुलासा

“मोदी फक्त गायीवर बोलतात महागाईवर बोलत नाहीत”, उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट!

…म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व राहणार; सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर