Loading...

पूरग्रस्त लोकांचं दु:ख पाहून शर्मिला ठाकरेंना रडू कोसळलं…!

सांगली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘होम मिनिस्टर’ शर्मिला ठाकरे सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. पूरग्रस्त लोकांचं दु:ख आणि हाल पाहून शर्मिला ठाकरे यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. अत्यंत मन हेलावून टाकणारी विदारक परिस्थिती सांगली कोल्हापुरात पाहायला मिळतीये.

ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील पिडितांची शर्मिला यांनी भेट घेत त्यांची विचारपूस केली. आणि त्यांचं सांत्वन केलं.

Loading...

सांगलीतील परिस्थिती खूप वाईट आहे. इथे फक्त मदतीची गरज नाही तर अख्खीची अख्खी कुटुंब उभी करायची गरज आहे. सरकारने यात मोलाची भूमिका बजावण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या.

सांगली दौऱ्यानंतर त्या कोल्हापूरला जाणार आहेत. महापुरात सापडलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतल्या पूरग्रस्तांची भेट त्या संध्याकाळी घेणार आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू- चंद्रकांत पाटील

-सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली त्याचं कौतुकच पण..- संभाजीराजे भोसले

‘आपला माणूस’ नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला; 500 घरं बांधून देणार

Loading...

-राधा झाली सौमित्रसाठी बावरी…. दिला लग्नाला होकार

-महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणते…

Loading...