महाराष्ट्र मुंबई

शर्मिला ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…

Photo Credit- Facebook/ Sharmila Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून शर्मिला ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्यातील सरकार हे आपल्या वादग्रस्त मंत्र्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. शर्मिला ठाकरे यांनी वसईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

पूजा चव्हाण आत्महत्या या प्रकरणात अनेकांची नावे येत आहेत. मात्र तपास योग्य दिशेने होत नाही. पोलिसांनी योग्य दिशेने या सर्व प्रकरणाचा तपास करणं गरजेचं आहे, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय.

कामे सरकारच्या दरबारात होत नसल्याने, लोक राज ठाकरेंच्या दरबारात काम घेवून येतात. आम्ही रस्त्यावर उतरुन लोकांची कामे करतो. सरकारनेही बाहेर उतरुन जनतेची कामे केली पाहिजेत, असा टोला शर्मिला ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द!

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

“संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील”

मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!

कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या