“नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणं सरकारचीच जबाबदारी”
मुंबई | मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलं आहे. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
लोक विकतची लस घेण्यास तयार आहेत. त्यांना विकतची लसही उपलब्ध करुन दिली जात नाही. जो टक्का लस विकत घेऊ शकत नाही. त्यांना मोफत लस दिली पाहिजे. ज्यांची लस विकत घेण्याची कुवत आहे. त्यांना विकत द्यावी. आपल्या देशातून जगाला लस उपलब्ध करुन दिली जाते. मात्र आपल्या देशातील नागरीकांना लस मिळत नाही. त्याची व्यवस्था पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी करावी, असं त्या म्हणाल्या.
लोकांकडून जीएसटी, इन्कम टॅक्स विविध कर वसूल केले जातात. हा पैसा जातो कुठे, असा सवाल उपस्थित करीत नागरीकांच्या कर रुपी पैशातून तरी लस विकत घेऊन ती नागरीकांना मोफत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोना काळात सामान्य सर्व सामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता त्याला वीजेची भरमसाठ बिले पाठवण्यात आली आहेत. विज बिले कमी करण्याचा शब्दसुद्धा सरकार पाळू शकलं नाही, अशी टीका त्यांनी केली.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर
‘लष्करात भरती करुन आम्हालासुद्धा देशसेवेची संधी द्या’; तृतीयपंथियांची पंतप्रधानांकडे मागणी
केंद्रात काही नेते फक्त भाषणं देतात, गडकरी प्रामाणिकपणे काम करतात- बच्चू कडू
“जनतेनं फेकून दिलं होतं, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे तुम्ही आज सत्तेत आहात”
“भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल”
Comments are closed.