Top News

…म्हणून उद्धव ठाकरेंची भेट न घेता अजित पवरांची भेट घेतली- शर्मिला ठाकरे

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेता अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. यावर शर्मिला ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहेत. वाडिया रुग्णालयासाठी जी काही तरतूद करायची आहे ती अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच हातात आहे. तेच ही तरतूद करु शकतात. म्हणून अजित पवार यांचीच वेळ घेऊन त्यांची भेट घेतल्याचं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबईतील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याप्रकरणी सरकारने तातडीने मदत करावी आणि रुग्णालय बंद होऊ नये या मागणीसाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांची भेट घेतली, असं शर्मिला ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवार हेच अर्थमंत्री आहेत. हा विषय आर्थिक तरतुदीचाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट न घेता अजिर पवार यांची वेळ घेतली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

ठळक बातम्या-

“किरकोळ लोकांच्या बोलण्याचा मला फरक पडत नाही, परत बोलाल तर लोक ताणून मारतील”

“वाद आणखी मिटला नाही, लेखकाने माफी मागावी”

“मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या