पुणे महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवतीची मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक

अहमदनगर | मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज अहमदनगरमधून सुरूवात झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा नेत्या शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेकली. 

आमदार वैभव पिचड यांनी मतदारसंघात कोणतीही उल्लेखनीय कामं केलेली नाहीत त्यामुळे त्यांना भाजपकडून तिकीट देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.

महाजनादेश यात्रा आज अकोल्यात होती. ती संपवून मुख्यमंत्री अकोल्यातून बाहेर जात असताना शर्मिला यांनी त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ताफ्यावर शाई फेकली.

दरम्यान,  महिलांच्यावरचे वाढते अत्याचार, शेतकरी आत्महत्या यासारखे मुद्दे घेऊन शर्मिला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला आडव्या गेल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेकली. 

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या