अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

Shashank Ketkar | अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडला. काहींना निकाल पाहून सुखद धक्का बसला आहे. तर काहींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अशातच आता अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्या पोस्टची जोरदार चर्चा आहे.

महाविकास आघाडीने राज्यात सर्वाधिक 30 जागांवर आघाडी मिळवली. तर दुसऱ्या बाजूला महायुतीने केवळ 18 जागावर आघाडी मिळवली आहे. मात्र महविकास आघाडी देशाच्या राजकारणात भाजपची सत्ता पालटण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अशातच आता शशांक केतकरने (Shashank Ketkar) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

शशांकची पोस्ट चर्चेत

शशांकने केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की कृपया करून आम्हाला स्वच्छ, प्रगत, सुरक्षित आणि आनंदी देश द्या. यासोबत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, लोकांनी एनडीएला असं यश दिलं आहे की त्यांना हरल्यासारखं वाटतंय. तर इंडिया आघाडीचा असा पराभव झाला की त्यांना हरल्यासारख वाटतंय. शशांकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Shashank Ketkar)

Shashank Ketkar : 'कृपया आम्हाला जगायला...', लोकसभेच्या निकालानंतर शशांक केतकरची पोस्ट चर्चेत 

शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत

त्यानंतर आता शरद पोंक्षे यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शरद पोंक्षे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं वाक्य पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. मला मुस्लिमांची ख्रिश्चनांची भिती वाटत नाही. मला हिंदूंची भिती वाटते. कारण हिंदूचं हिंदूंच्या विरोधात उभे ठाकतात, शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने दमदार उभारी घेत 30 जागांवर आघाडी मिळवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे, बीडमध्ये नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे विजयी झाले. तर दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विजयी झाले आहेत.

तर महायुतीने 17 जागांवर विजय मिळवला आहे. याचा परिणाम हा आगामी विधानसभा निवडणुकीवर पाहायला मिळू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीत हिच परिस्थिती पाहायला मिळू शकते.

News Title – Shashank Ketkar Share Social Media Post After Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ भागात पूरसदृश्य पाऊस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी! फडणवीसांनंतर ‘या’ नेत्यानेही घेतला मोठा निर्णय

“देवेंद्र फडणवीस राजकारणातील आनंदीबाई, पक्ष फोडणारा खलनायक”

पराभवानंतर पंकजा मुंडेंची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाल्या…

ड्रीम गर्ल ते ड्रामा क्वीन..’या’ बॉलीवुड कलाकारांनी राजकीय मैदानही गाजवलं