दुबई | इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अध्यपदाचा राजीनामा दिला आहे. शशांक यांनी दोन वेळा दोन वर्षांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर आज त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
आयसीसीची यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष असलेले इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी म्हणून परिषदेचा कारभार सांभाळतील असा निर्णय घेण्यात आला. शशांक मनोहर हे जून महिन्यात पदावरून पायउतार होणार होते. मात्र कोरोनाच्या एकूण परिस्थितीमुळे आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक लांबणीवर पडल्याने मनोहर यांना पुढील दोन महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ऑगस्टपर्यंत मनोहर ICC च्या अध्यक्षपदी कायम राहणार होते, पण अखेर आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
2016 मध्ये शशांक मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये ते पुन्हा बिनविरोध निवडून आले. शिवाय 2008 ते 2001 या काळात शशांक मनोहर BCCI चे प्रमुख होते.
अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला येत्या आठवड्यात आयसीसीकडून मान्यता मिळणं अपेक्षित आहे. ‘‘सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसाधारण सभा जून महिन्यात होणं अशक्य आहे. त्यामुळे किमान दोन महिन्यांच्या कालावसाठी मनोहर हेच ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदी राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात ‘आयसीसी’ला नवा अध्यक्ष मिळू शकेल,’’ असं ‘आयसीसी’च्या संचालक मंडळाच्या सदस्याने त्यावेळी सांगितलं होतं.
ट्रेंडिंग बातम्या-
“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”
लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद
महत्वाच्या बातम्या-
भाजपच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची बाधा
एनडीएसटीचे अध्यक्ष रामराव बनकर यांना एसीबीने ठोकल्या बेड्या
राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान, पाहा तुमच्या भागात किती अॅक्टीव्ह रूग्ण
Comments are closed.