मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे राज्य सरकारसोबत केंद्र सरकारच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी केंद्राची टीम पाठवण्यात आली आहे. या कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोरोनाला रोखण्याचा मार्ग सांगितला आहे.
कोरोनाची प्रकरणं दोन ते चार आठवड्यांतच कमी होऊ शकतात. पण त्यासाठी लोकांनी कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन करायला हवं. लसीकरणामुळे आजार आणि मृत्यूपासून संरक्षण मिळेल पण संसर्गापासून नाही, असं महाराष्ट्राच्या कोव्हिड 19 टास्क फोर्सचे सदस्य शशांक यांनी सांगितलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे पण गंभीर नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊन आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण आरोग्य व्यवस्थ आधीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे, असंही शशांक यांनी म्हटलंय.
प्रशासनाने जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न करावा. पुढील तीन ते सहा महिन्यात लशीचे बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतील. सध्याच्या लशी या जवळपास 12 महिने प्रतिकारक शक्ती देते, असं त्यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
पंजाने धनुष्यबाणाशी जुळवून घेतलं, घड्याळाचं टायमिंग चुकलं, कमळाचं गणित हुकलं!
‘…म्हणून आम्ही सर्वांना कोरोना लस देत नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं कारण
‘…अन्यथा उद्रेक होईल’; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा
गृहमंत्रिपदी विराजमान होताच दिलीप वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना इशारा
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.