बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शशी कपूर यांचा नातू लवकरच करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

मुंबई | बाॅलिवूडमध्ये स्टार किड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण करत असतात. यात काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. आता या यादीमध्ये आणखी एका नव्या स्टारकिड्ची भर पडली आहे. दिवंगत अभिनेते शशि कपूर यांचा नातू जहान पृथ्वीराज कपूर लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

कुणाल कपूर व शीना यांचा मुलगा जहान, हंसल मेहता यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जहानसोबत आदित्य रावल देखील स्क्रीन शेअर करणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून जहान आणि आदित्य त्यांच्या आगामी चित्रपटासाठी तयारी करत आहेत. पण या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

या चित्रपटात आदित्य रावल हा नवा चेहराही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हंसल यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी जहान व आदित्य यांना खास ट्रेनिंग दिलं आहे.

दरम्यान, जहान व आदित्य आपल्या डेब्यू सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्यांच्याइतकेच आम्हीही उत्सुक आहोत. दोघांनीही या सिनेमासाठी अगदी जीवतोड मेहनत केलीये. आम्हाला या चित्रपटासाठी दोन नव्या चेहऱ्यांचा शोध होता. प्रेक्षकांना पडद्यावर एक कॅरेक्टर पाहण्याचा फिल यावा, हा आमचा विचार होता. आम्ही शूटींग सुरू केले आहे आणि आदित्य व जहान ज्या पद्धतीने काम करताहेत, ते कौतुकास्पद आहे, असं अनुभव सिन्हा यांनी सिनेमाविषयी बोलताना सांगितलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zahan (@zahankapoor)

थोडक्यात बातम्या – 

“संघाची सकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली पाहून या टोळीला मोठा धक्का बसला आहे”

पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एसबीआयच्या अहवालाने चिंता वाढली!

‘हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा’; चित्रा वाघ आक्रमक

आनंदाची बातमी! देशातील वाढणारी कोरोना रुग्णसंख्या अखेर आली आटोक्यात

“शिवीगाळ झाली पण ती कोणी केली यासाठी भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More