बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुमित्रा महाजनांच्या निधनाची फेक न्यूज शेअर केल्याने शशी थरूर यांची फजिती; वाचा नेमकं काय झालं…

नवी दिल्ली | दररोजच्या धावपळीच्या जीवनात सोशल मिडियामधून अनेक फेक न्यूज समोर येत असतात. अनेक जण याच फेक न्यूजला बळी देखील पडतात. असाच एक प्रकार गुरूवारी रात्री घडला. काँग्रेस नेते शशी थरूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या फेक न्यूजला बळी पडले आहेत.

काँग्रेस नेते शशी थरूर आणि दिल्ली महिला काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करण्यात आलं. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या दुःखद निधन झाल्याचं ट्विट करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेकांना सुमित्रा महाजन गेल्याचा धक्काच बसला. त्यानंतर ट्विटरवर सुमित्रा महाजन नावाचा ट्रेंड चालू झाला. मात्र सुमित्रा महाजन महाजन यांच्या संदर्भातील वृत्त खोटं आहे, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली. त्यांनी शशी थरूर यांचं ट्विट रिट्विट करत म्हटलं की, ताई एकदम स्वस्थ है। भगवान उन्हे लंबी उमर दे…! असं त्यांनी लिहिलं. त्यानंतर शशी थरूर यांनी सुमित्रा महाजन यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असं नवं ट्विट केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे देखील या अफवेला बळी पडले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही ट्विट करत सुमित्रा महाजनांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र त्यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं. परंतु अनेकांनी याचा स्क्रीन शॉट काढून ठेवला होता.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

बंगळुरुचा विजयी चौकार, राजस्थानवर 10 विकेट्सने मिळवला विजय

धक्कादायक! बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली झोपले अन् पत्नीसमोर सोडला प्राण

आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची संपूर्ण नियमावली; वाचा एका क्लिकवर…

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

चिंता वाढली… महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More