बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चूक असेल तर मान्य करायला काहीच हरकत नाही’; शशी थरूर मोदींना म्हणाले ‘SORRY’

नवी दिल्ली | दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आपण बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी तुरूंगात गेलो होतो, असं वक्तव्य नरेंद्र मोदी केलं होतं, यावरून सोशल मीडियाद्वारे मोदींवर चांगलीच टीका होत आहे. तर याच घटनेवरून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी एका चुकीचं ट्विट केल्यानंतर त्यांनी जाहीरपणे मोदींची माफी मागितली आहे.

मोदींच्या खळबळजनक वक्तव्यामुळे शरी थरूर यांनी पहिल्यांदा एक ट्विट केलं. ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण: आपले पंतप्रधान बांग्लादेशला फेक न्युजचा आस्वात देत आहेत. सगळ्यांना माहिती आहे की बांग्लादेशला स्वातंत्र्य कुणी मिळवून देिलं’, असं ट्विट थरूर यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली.

थरूर यांनी लगेच दुसरं ट्विट करत माफी मागितली. ‘माझी चूक असेल तर ती मान्य करायला काहीच हरकत नाही. काल मी बातम्यांचे मथळे आणि काही ट्विट वाचून ट्विट केलं होतं. मागील ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांनी यांचा उल्लेख केला नाही. असा त्याचा अर्थ होता. पण त्यांनी त्यांचा उल्लेख केला…. साॅरी, असं दुसरं ट्विट थरूर यांनी केलं आहे.

दरम्यान, बांग्लादेशच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे शशी थरूर वेळोवेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. तर थरूर यांचा हा दिलदार स्वभाव अनेकांना आवडला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का!

शेवटी प्रेम ते प्रेमच! पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीनेही सोडले प्राण

‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग!

‘ज्या अभिनेत्रीच्या हातावर मी थुंकतो ती…’ ; अमिर खानचा व्हिडीओ व्हायरल

“शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे तपासण्याची गरज”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More