Shashi Tharoor - शशी थरुर यांनी वापरलेल्या floccinaucinihilipilification शब्दाची राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- देश

शशी थरुर यांनी वापरलेल्या floccinaucinihilipilification शब्दाची राजकीय वर्तुळात एकच चर्चा

नवी दिल्ली | काँग्रेस नेते शशी थरुर यांनी  `द पॅरॉडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अॅण्ड हिज इंडिया’ हे पुस्तक लिहिलं आहे. महिन्याअखेरीस हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे. 

शशी थरुर यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाचं ट्विट केलं. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये Floccinaucinihilipilification ( फ्लॉक्सीनॉसीनिहिलीफिकेशन) हा शब्द वापरला. त्यांच्या या शब्दाची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

काडीमोल ठरवणारी कृती किंवा सवय असा या शब्दाचा अर्थ होतो. शशी थरुर यांच्या इंग्रजीचे कायमच दाखले दिले जातात. 

दरम्यान,  `द पॅरॉडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अॅण्ड हिज इंडिया’ या पुस्तकात मोदींच्या विरोधाभासी निर्णयाची चिरफाड करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-ते विखेंना खूश करण्यासाठी बोलले; मात्र काहीही झालं तरी नगर सोडणार नाही!

-बाबारे, धोनीची नक्कल करु नकोस; ऋषभ पंतला दिग्गजांचा सल्ला

-मोठी बातमी | नाना पाटेकरांसह सारंग, आचार्य, सिद्दकींविरोधात गुन्हा दाखल

-#MeToo मुळे विकृत संस्कृती उदयाला येऊ शकते- शिवसेना

-गायक कैलाश खेरवर गंभीर आरोप; माझ्या मांडीवर हात ठेवला अन्…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा