Top News देश

…तर मग यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये?- शशी थरूर

नवी दिल्ली | आपल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसतील तर या वर्षीचा शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळा रद्दच का करू नये, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केला आहे.

भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. यावरून थरूर यांनी भाजपला सवाल केला आहे.

भारतातही कोरोना संकटाचे सावट कायम असताना संचलनासाठी लोकांना बोलावणंही बेजबाबदारपणाचं असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, शशी थरूर यांच्या या प्रश्नावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर नेपाळ भारतात असता’; प्रणब मुखर्जींनी आपल्या अखेरच्या पुस्तकात सांगितली राज की बात

“काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाही तर शिवसेना ठरवणार, काँग्रेसचा स्वाभिमान संपला”

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माचं पुनरागमन

‘आम्ही नाटक कंपनी असलो तरी…’; निलम गोऱ्हेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या