दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद

पुणे | दहशतवाद्यांनी काल सायंकाळी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर यांच्यासह दोन जवान शहीद झाले आहेत. शशीधरन नायर खडकवासला येथे राहत होते. 

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणला. यावेळी गस्त घालत असणारे मेजर शशीधरन नायर यांच्यासह दोन जवानांना वीरमरण आले.

मेजर शशीधरन यांचं वय 33 वर्षं होते, ते गेल्या 11 वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते.

दरम्यान, मंगळवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या पथकावर पुलवामा जिल्ह्यात हल्ला केला होता. यानंतर भारतीय लष्करानं एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे

-“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”

-भाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा ‘मोदी अगेन’

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”