बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी जाहीर

मुंबई |   भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने विधानपरिषदेसाठी आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादीने देखील आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे युवकचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

साताराच्या कोरोगाव विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. ते याअगोदरच्या आघाडी सरकारच्या काळात मंत्री देखील राहिले आहेत. तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला होता. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून त्यांनी आपली छाप सोडली होती. तत्कालिन भाजप शिवसेना सरकारवर त्यांनी जोरदार तोशेरे ओढत महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं होतं. पक्षाने या दोन्ही नेत्यांना संधी दिली आहे.

शशिकांत शिंदे यांच्या रूपाने एका निष्ठावंताला तर अमोल मिटकरी यांच्या रूपाने एका नवख्या चेहऱ्याला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरून उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून स्वत: उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे, भाजपकडून गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजित सिंह मोहिते पाटील आणि डॉ. अजित घोपछडे, काँग्रेसकडून राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

अजानसाठी लाऊड स्पीकरचा होणारा वापर बंद करावा; जावेद अख्तर यांची मागणी

राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!

महत्वाच्या बातम्या-

…तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना मेसेज

मटकाकिंग रतन खत्रीचं निधन

पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज; कोरोनातून सावरल्यानंतर आव्हाडांची फेसबुक पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More