बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ राड्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी मागितली माफी, म्हणाले…

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालानंतर सातारा जिल्ह्यात चांगलाच राडा पाहायला मिळाला. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या या चुरशीच्या लढाईत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा कार्यालयात चांगलाच राडा घातला.

शिंदे समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीनंतर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांच्या वतीने माफी मागितली आहे. कार्यकर्त्यांनी जे काही केलं ते भावनेच्या भरात केलं आणि हे योग्य नाही म्हणून मी सर्वांची माफी मागतो, असं शशिकांत शिंदे म्हणाले. तर ज्या पक्षाने उभा केलं त्या पक्षाच्या कार्यालयाविरोधात अशी भूमिका घेणं योग्य नसल्याचंही शशिकांत शिंदे म्हणाले.

मी आजही पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. माझ्याकडून असं कधीही होणार नाही. मी पक्षासाठी जीवही देईन, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांसह सर्वांची माफी मागितली आहे. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं तर मी माफी मागतो. माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ नये, असं आवाहनही शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान,शशिकांत शिंदे यांच्या विरोधात या निवडणुकीत जाणीवपूर्वक कट करण्यात आला असल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंना जाणीवपूर्वक गाफिल ठेवलं. शिंदे जिल्ह्याचं नेतृत्व बनू पाहात होते. पण काही लोकांना ते पटत नव्हतं आणि म्हणूनच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली, असं स्पष्टीकरण शिंदे समर्थकांनी दिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“तेव्हा भाजप सत्तेत असती तर काश्मीर, जूनागढ, हैद्राबाद संस्थानांना पाकिस्तानला जा असं…”

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

साताऱ्यात राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

भाविकांची प्रतिक्षा संपली; सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे अखेर उघडले

मनसेला मोठा धक्का, पुण्यातील हा दिग्गज नेता पक्ष सोडण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More