बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाही’; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

सातारा | सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नुकतेच राष्ट्रवादीचे नितीन पाटील याची वर्णी लागली आहे. अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांना अध्यक्षपदासाठी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला आहे. मी निवडून आलो असतो तर शिवेंदराजेची शिफारस पवार साहेंबाकडे करू शकलो असतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, याआधी शिवेंद्रराजे अध्यक्ष झाले होते. तेव्हा सुद्धा मीच पवार साहेबांकडे शिफारस केली होती. मात्र, यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली. त्यामुळेच शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. मी निवडून आलो असतो,तर मी त्यांची शिफारस केली असती , असा खोचक टोला शिंदेनी लगावला आहे.

पुढे शिंंदे म्हणाले, शिवेंद्रराजे यांना अध्यक्षपद देऊ नक, असं सांगायला मी गेलो नव्हतो. मी पराभूत झालो असलो तरी माझा बँकेत हस्तक्षेप नव्हता. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले तरी त्याचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं नव्हतं. जिल्हा बँकेच कामकाज पक्षविरहीत असतं. सहकार पॅनेलची निर्मिती देखील पक्षविरहीत झाली होती, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सातारा जिल्हा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात चांगलंच राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं होत. शशिकांत शिेंदे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला होता. या पराभावामागे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप शशिंकात शिंदेसह इतर अनेक नेत्यांनी केला होता. या निवडणुकीत शिंदे आणि शिेवेंद्रराजे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More