बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शशिकांत शिंदेंना ठरवूनच पाडलं, शिंदेंचा विजय झाला असता तर…”

मुंबई | सातारा जिल्हा सहकारी बँक निवडणूक (Satara District Co-operative Bank Election) नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एक वेगळचं राजकिय नाट्य रगल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीत उद्यनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रामराजे निंबाळकर यांचा विजय झाला. मात्र,जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेहमी हावी ठरणारे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde) यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही ( Samana ) या मुद्द्यावर भाष्य करण्यात आले आहे.

सामनाच्या आग्रलेखातून सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी शशिकांत शिदें यांचा पराभव ठरवूनच झाला असल्याचं म्हटलं आहे. पुढे ते म्हणतात, ‘सातारा निवडणुकीत उद्यनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रामराजे निंबाळकर यासांरख्या प्रमुख नेत्यांचा विजय झाला मात्र शशिकांत शिदेंना ठरवून पाडलं गेलं. शिंदेचा विजय झाला असता तर जिल्ह्यातील सहकाराची सुत्रे त्यांच्या हाती गेली असती,’ असंही राऊतांनी आग्रलेखात म्हटलं आहे.

याशिवाय पुढे राऊत म्हणाले, ‘सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे हेवीवेट शशिकांत शिंदे फक्त एका मताने पराभूत झाले. त्यांच्याच पक्षातील एका साधे कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यामुळे शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केला, दगडफेक केली,’ असं म्हणत राऊतांनी शशिकांत शिंदेच्या पराभावामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याचा आरोपही त्यांनी सामनातून केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या पराभावामागे राजकीय षडयंत्र असल्याचं बोललं जात आहे. स्वत: शशिकांत शिंदे यांनीही ते बोलून दाखवलं आहे. राष्ट्रवादीकडूनच शशिकांत शिदें यांच्या पराभवाचे षडयंत्र रचले होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More