खटावला कसा दुष्काळ जाहीर होत नाही तेच बघतो- शशिकांत शिंदे

सातारा | राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र या दुष्काळ यादीतून खटाव तालुका वगळला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

येत्या १९ तारखेपासून अधिवेशन चालू होत असून त्यामध्ये खटावला कसा दुष्काळ जाहीर होत नाही तेच बघतो?, असं शशिकांत शिंदे यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

दुष्काळ जाहीर न करणे हे भाजपाचे पाप असून या तालुक्यातील त्यांच्या नेत्यांना मत मागण्यांचा नैतिक अधिकार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्य सरकारने 26 जिल्हे आणि 151 तालुक्यांमध्ये मध्यम आणि गंभीर प्रकारचा दुष्काळ जाहीर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर

-रायगडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणाराच- चित्रा वाघ

-युतीचं तुमचं तुम्ही पाहा मात्र राम मंदिराच्या प्रश्नावर एकत्र या- आरएसएस

-सुप्रिया सुळेंचं अनोख आंदोलन; सकाळी साडेसहा वाजता केलं भजन

-…अखेर बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद संपला; जयदेव ठाकरेंची माघार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा