Top News

“तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही…”

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अजित पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शशिंकात शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय.

तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा करत आहात, अशी बोचरी टीका शशिंकात शिंदे यांनी केली आहे.

सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत, याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता, असं शशिंकात शिंदे म्हणालेत.

 

महत्वाच्या बातम्या-

‘मुंबई दरवर्षी कशी तुंबते?’; गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र

‘आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देतात’; शिवसेनेचा आरोप

धक्कादायक! दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होऊन महिलेचा मृत्यू

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने दिली माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या