बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना घरच्या मैदानात रोखणार राष्ट्रवादी??

सातारा | सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर उदयनराजेंची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र उदयराजेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या घरच्या मैदानावर रोखण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदेना मंत्रिपद देवून स्थानिक स्वराज्य संस्थेत राजेंची कोंडी करता येवू शकते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्याचा काही भाग येतो मागच्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंनी शिंदेच्या विरोधात रान उठवलं होतं त्यातून शिंदेंना पराभवाला सामोर जाव लागलं होतं.

शशिकांत शिंदेचा चेहरा पुढे करून साताऱ्यात राजेंना शह देण्याची खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जात. सध्या राजेंची बालेकिल्यात झालेली ढिली पकड ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी नामी संधी आहे.

दरम्यान, उदयनराजेंचा पराभवाचा वचपा काढण्याची संधी शिंदे शोधतायत, त्यामुळेच राजेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिंदेंसारख्या सरदाराला बळ देण्याची रणनीती आखण्यात आली असल्याचं समजत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

‘कोरोना’मुळे महाराष्ट्रातील 600 यात्रेकरु इराणमध्ये अडकले

महत्वाच्या बातम्या-

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी

सुप्रिया सुळेंनी केलं रक्षा खडसेंचं कौतुक; नाथाभाऊ म्हणतात…

एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच केलं फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More