बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साताऱ्यात राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रवादीचे नेेते शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात हा पक्षांतर्गत राडा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा जावळी सोसायटी मतदारसंघातून पराभव झाला. अवघ्या एका मताच्या फरकाने शशिकांत शिंदेचा पराभव झाल्याने शिंदे समर्थकांनी रागारागात आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली असल्याचं म्हटलं जात आहे.

शशिकांत शिंदे यांच्या विरोधात या निवडणुकीत कट रचण्यात आला. शशिकांत शिंदेंचा जाणीवपूर्वक पराभव करण्यात आला आणि याचा निषेध म्हणूनच आम्ही पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली, असं स्पष्टीकरण यावेळी शिंदे समर्थकांकडून देण्यात आलं आहे. तर दगडफेक करताना शशिकांत शिंदे यांचा विजय असो, अशी घोषणाबाजी देखील कऱण्यात आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाने शशिकांत शिंदेंना जाणीवपूर्वक गाफिल ठेवलं. ही बाब शरद पवार आणि अजित पवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सूचना दिल्या पण तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंना अडचणीत आणलं. पक्ष वाढवणारे शिंदे जिल्ह्यातील एकमेव नेते आहेत. शशिकांत शिंदे जिल्ह्यातील नेतृत्व बनू पाहत होते पण काही लोकांना हे पटत नसल्याचा आरोपही शशिकांत शिंदे समर्थकांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

स्वत:चा अपघात होऊनही रविकांत तुपकरांनी जखमींना केली मदत

अमरावतीकरांसाठी बाजारपेठा सुरू पण संचारबंदीचे ‘हे’ नियम मात्र कायम

नवाब मलिक उर्दूत नाव लिहितात म्हणून भक्तांना…; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More