सातारा | विधानसभा निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: जात आहेत. आज साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांच्या येण्याने राष्ट्रवादीचे नेते भावूक होताना दिसून येत आहे. गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी तसेच मतदार संघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांकडून मिळणारी ऊर्जा महत्वाची आहे. साहेबांना भेटताना मनात एकच भावना येते ती म्हणजे साहेब, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, असं ट्वीट शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.
शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी शशिकांत शिंदे यांच्याा आयोजित रॅलीमध्ये ते सहभागी होतील.
गुरूवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार मुंब्रा-कळव्यात गेले होते. त्यावेळी आव्हाड चांगलेच भावूक झालेले पहायला मिळाले.
गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी तसेच मतदार संघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांकडून मिळणारी ऊर्जा महत्वाची आहे. साहेबांना भेटताना मनात एकच भावना येते ती म्हणजे “साहेब, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.”
— Shashikant Shinde (@shindespeaks) October 4, 2019
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेची मोठी चाल; जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात उमेदवार ठरला! https://t.co/tGgZ5gHTXO @Awhadspeaks @deepalisayed @ShivsenaComms
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
…म्हणून जितेंद्र आव्हाडांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही!- https://t.co/YmIdLBj5Ct @Awhadspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद अडकल्या शिवबंधनात; मतदारसंघही ठरला! https://t.co/4yrEysCRCY @deepalisayed @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.