सातारा | खटावचा भूमिपुत्र म्हणून मतांचा जोगवा मागणाऱ्यांनी जि. प. सदस्य असताना काय दिवे लावले याचा हिशेब द्यावा. ज्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर तुम्हाला खटाव, पुसेगावच्या मतदारांनी निवडून दिलं. त्याच मतदारांचा विश्वासघात करून राजकीय अज्ञातवासात का गेला होतात? परदेशात अज्ञातवासातात जाणाऱ्यांनी भूमीपुत्राच्या नावाने मते मागू नये, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
10 वर्षांपूर्वी मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झालो ते फक्त जनतेच्या प्रेमापोटी त्यावेळी विद्यमान पोस्टरबॉय कुठे होते? त्यावेळी का सुचलं नाही शशिकांत शिंदे भूमीपुत्र नाहीत, असा सवाल शिंदे यांनी विचारला आहे.
मताचा जोगवा मागणारे हे विसरतात की या मतदारसंघात अजूनही 2 तालुके येतात. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या या आयात उमेदवारांची संकुचित वृत्ती चांगलीच लक्षात ठेवावी. हा शशिकांत शिंदे महाराष्ट्राच्या मातीत जन्मला आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, स्वत:ला भूमिपुत्र म्हणून घेणारे निवडणुकीनंतर पुन्हा अज्ञातवासातजातील त्यामुळे जनता तुमच्या भावनिक आवाहनाला बळी पडणार नाही, असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
घड्याळ बंद पडलेल्यांना मतदान करुन घाटे का सौदा करु नका- स्मृती इराणी https://t.co/1ygyIZ5BtL @BJP4Maharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना ईडीकडून नोटीस; त्यावर पटेल म्हणतात… https://t.co/c6F38FscTq @praful_patel @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
“वातावरण फिरलंय; डिस्कळकराचं ठरलंय” https://t.co/ttFh7cXFQd @shindespeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
Comments are closed.