बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल आणि बिअरची तुलना केल्याने शत्रुघ्न सिन्हा ट्रोल! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मुंबई | बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचं कमळ सोडून काँग्रेसचा हात धरलेले शत्रुघ्न सिन्हा आपल्या वक्तव्यांंमुळं नेहमीच चर्चेत असतात. ते वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत असतात. देशातील महागाई आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींवर त्यांनी विनोदात्मक टिप्पणी केली आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी देशातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीची त्यांनी बिअरशी तुलना केली आहे. त्यांना त्यांच्या या अजब तुलनेमुळं नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिअरची बॉटल दिसत आहे. अनेक वर्षांनी बिअर ही पेट्रोलपेक्षा स्वस्त झाली आहे. आता नवीन काही घोषणा काही असेल तर फक्त पीत रहा आणि गाडी चालवू नका. हे त्यांचे ट्विट टविटरवर तुफान व्हायरल होत आहे.

शत्रुघ्न सिन्हांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत ट्रोल केलं आहे. चरस आणि अफीम तर अजून स्वस्त आहेत. म्हणूनच बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री त्याचं सेवन करतात, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. बिअर प्या आणि गाडी चालवू नका, असं दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, देशात वर्षभरापासून पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. शत्रुघ्न सिन्हांनी मोदी सरकारवर निशाना साधताना साधला आहे. त्यांच्या या ट्विटची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवल्याचं पहायला मिळत आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या – 

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव अन् सांगलीत टीव्ही फोडला; पाहा व्हिडीओ

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More