Shatrughan Sinha | बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हांची तब्येत बिघडली आहे. मुलगी सोनाक्षी सिन्हाचे लग्न झाल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. अशात ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव याने वडिलांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. ताप असल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनाक्षी हिच्या लग्नानंतर वडिलांची प्रकृती खालावली होती. ताप असल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता, असं लव सिन्हा म्हणाला आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट
सध्या शत्रुघ्न सिन्हांची तब्येत स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती लव सिन्हाने दिली आहे. लग्नानंतर वडिलांना बघण्यासाठी सोनाक्षी रुग्णालयात देखील गेली होती. यावेळी तिच्यासोबत नवरा झहीर देखील होता. जावई आणि मुलगी सोनाक्षी यांनी शत्रुघ्न सिन्हांच्या (Shatrughan Sinha) तब्येतीबाबत विचारपूस केली.
त्यामुळे सध्या सर्वत्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. चाहत्यांकडून ते लवकरच ठीक व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली. सोशल मीडियावर देखील शत्रुघ्न सिन्हांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
सोनाक्षीच्या लग्नानंतर बिघडली शत्रुघ्न सिन्हांची तब्येत
सोनाक्षीच्या लग्नादरम्यान शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोनाक्षीच्या नात्याला त्यांनी विरोध केल्याचं देखील म्हटलं गेलं. मात्र, शत्रुघ्न सिन्हांनी (Shatrughan Sinha) ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. शिवाय ते लग्नात आनंदी देखील दिसत होते.
“माझ्या मुलीने काहीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक काम केलेलं नाही. लग्न दोन लोकांमधील खासगी निर्णय आहे. कोणाला देखील यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.”, असं शत्रुघ्न सिन्हा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते. दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
News Title – Shatrughan Sinha Health Update
महत्वाच्या बातम्या-
लग्न केलं एकासोबत आणि रहायचंय बॉयफ्रेंडसोबत, विवाहीत महिलेची अजबच मागणी
“तुला बायको ना मुलगी, ना संसार,भटका माणूस..”; संभाजी भिडेंचा कुणी घेतला समाचार?
तृणमूल नेत्याची भर रस्त्यात महिलेला अमानुषपणे मारहाण; व्हिडिओ व्हायरल
“हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, समझने वाले को इशारा काफी”
सूर्याच्या कॅचवरून आफ्रिकन चाहत्यांचे सवाल; माजी दिग्गज खेळाडूने दिलं जोरदार प्रत्युत्तर