बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीची ही बैठक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तिसऱ्या आघाडीचा हा आरंभ सुरू झाला आहे. यात अजून लोक जोडल्या जातील. ही मोहीम संपूर्ण देश ढवळून काढेल, असा विश्वास शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते. मी ही या बैठकीला जाणार होतो. पण काही कारणास्तव पोहोचू शकलो नाही. मात्र, या घडामोडीतून चांगलं निष्पन्न होईल, असं त्यांनी म्हटलंय.

दक्षिण भारतातील बहुतेक पक्षही जोडले जातील. भाजपने धन शक्ती आणि भय शक्तीचा प्रयोग केला. मात्र, आता काही लोकांचे डोळे उघडले आहेत. प्रत्येक निवडणुकीत लोकांना फोडलं जातं. हे योग्य नाही, असं म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला.

यशवंत सिन्हा हे स्टेट्समन आहेत. त्यांच्या आणि देशातील सर्वात मोठे राजकीय चाणक्य शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्वजण एकत्र येत आहेत. सर्वांची एकजूट होणं ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. आज सुरुवात झालीय. यापुढे आणखी लोक यात समील होतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा राजकीय अभ्यास दांडगा आहे. त्याही आमच्यासोबत आहेत. जर नसतील तर येतील, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मोदींचा आणखी एक मोठा निर्णय, ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात!

कोविशील्ड लस घेतलेल्या 11 जणांना झाला हा दुर्मिळ आजार; तज्ज्ञांचा दावा

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा- उच्च न्यायालय

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल!

भारताला मिळणार चौथी लस; ‘या’ लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More