पाटणा | काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे सुपुत्र लव सिन्हा याला पराभवाचा धक्का बसला आहे. बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितीन नवीन यांनी लव सिन्हाचा पराभव केला आहे.
बांकीपूर विधानसभा मतदारसंघात नितीन नवीन हे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी 33 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजय मिळवला.
एकूण मतांपैकी 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतं नितीन नवीन यांना मिळाली आहेत. जवळपास 18 हजारांच्या मताधिक्याने नितीन नवीन विजयी झालेत.
दरम्यान, बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“देवेंद्र फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला- शरद पवार
तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार
…म्हणून मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत- संजय राऊत
“फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश”