शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती बिघडली?, लेक सोनाक्षी आणि जावई झहीर यांनी घेतली भेट

Shatrughna Sinha Health | अभिनेता झहीर इकबाल आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचे गेल्या काही वर्षांपासून अफेयर होतं. नुकतेच त्यांनी कोर्ट मॅरेज करून विवाहाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र दोघांच्या विवाहानंतर ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती (Shatrughna Sinha Health) बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी लेक सोनाक्षी आणि जावईबापू झहीर इकबाल शत्रुघ्न सिन्हांच्या भेटीस गेले.

शत्रुघ्न सिन्हांच्या प्रकृतीबाबत अपडेट

रूग्णालयाच्या बाहेर झहीर इकबाल आणि सोनाक्षी सिन्हा स्पॉट झाल्याने सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र ही केवळ एक अफवा असल्याचं दिसून आलं आहे. झहीर आणि सोनाक्षी हे शत्रुघ्न सिन्हांच्या प्रकृतीची विचारपूस करायला आले होते. तसेच नुकतंच सोनाक्षीचं कोर्ट मॅरेज झालं. त्यामुळे जरा धावफळ झाल्याने त्यांना थकवा जाणवला. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सध्या शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत ठिक असल्याती माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांची रेग्युलर तपासणी करण्यासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. धावपळीमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. मात्र सोनाक्षी रूग्णालया बाहेर दिसल्याने गरोदरपणाची भलतीच चर्चा सुरू झाली होती. मात्र त्या चर्चावर अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

सोनाक्षी आणि झहीर शत्रुघ्न सिन्हांच्या भेटीला

सोनाक्षी आणि झहीर इकबाल हे रूग्णालया बाहेर स्पॉट झाले आहेत. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सध्या शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती ही व्यवस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या लेकीच्या विवाहाला घेऊन चर्चेत आले आहेत. त्यांना आपल्या लेकीच्या विवाहाला विरोध होता. त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Snehkumar Zala (@snehzala)


ते आंतरधर्मीय विवाहाला घेऊन नाराज असल्याची माहिती समोर आली होती. मात्र ही एक अफवा असल्याचं समजलं जातंय. सोनाक्षीचे वडील आणि आई दोघेही कोर्ट मॅरेजसाठी 23 जून रोजी उपस्थित होते. तसेच त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन देखील ठेवण्यात आलं होतं.

या विवाहाच्या रिसेप्सनसाठी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री तसेच गायक उपस्थित होते. यावेळी रॅप आणि गायक हनी सिंहचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान सोनाक्षीने विवाहात आपल्या आईने नेसलेली साडी परिधान केली होती. सोनाक्षीच्या विवाहानंतरही सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे चर्चेत असल्याचं दिसून येत आहे.

News Title – Shatrughna Sinha Health Update After Sonakshi And Zaheer Iqbal Marriage

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup फायनल आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर!

सरकारी नोकरीची संधी! ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरु

गुड न्यूज! ‘या’ शहरांत पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

ग्राहकांना झटका! महिन्याच्या शेवटी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

सावधान! राज्यातील ‘या’ भागात पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट जारी