देश

शत्रुघ्न सिन्हांचा मोदीवर हल्लाबोल; पोस्टर-बॅनर्स लावूनच गाजावाजा केला!

नवी दिल्ली | सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेण्यासाठी पोस्टर-बॅनर्स लावून मोठा गाजावाजा केला, इंदिरा गांधी यांनी बांगलादेशची निर्मिती केली, तेव्हाही एवढे पोस्टर-बॅनर्स लागते नव्हते, जेवढे आज लागले आहेत, अशी जोरदार टीका भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली.

सर्जिकल स्ट्राइकचा एवढा गाजावाजा का केला जात आहे. अशा प्रकारच्या कारवाया यापूर्वीही झालेल्या आहेत, सर्जिकल स्ट्राइक हा लष्कराच्या रणनितीचा भाग आहे, त्याबाबतचं राजकारण का केलं जात आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाला होता पण तेव्हाही एवढा गाजावाजा केला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून आम्हाला कर्नाटकमध्ये अपयश आलं- येडीयुरप्पा

-विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी जाहिर

-… तर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही- राजू शेट्टी

-राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचा कट फसला; काँग्रेसचा नगरसेवक फरार!

-गिरीश महाजनांसमोर खडसेंनी घेतलं झुकतं माप!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या