भाजप म्हणजे “वन मॅन शो” आणि “टू मॅन आर्मी”!

नरसिंहपूर | भाजप म्हणजे “वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी” आहे, असा घणाघात भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. त्यांनी अशाप्रकारे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर शरसंधान साधलं.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी चार दिवसीय उपोषण केलं. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले असताना त्यांनी मोदी-शहा जोडीवर टीकास्त्र सोडलं. 

सध्याच्या सरकारमधील 80 टक्के मंत्र्यांना कुणीच ओळखत नाही, ओळखत असतील तर मानत नाहीत. अटलजींच्या सरकारमध्ये सर्व मंत्र्यांना मान होता. आता आम्ही सर्वांनी एकत्र मिळून निर्णय घ्यायला हवा, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय.