‘भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे, पण…’; मिथुन चक्रवर्ती आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जुंपली
नवी दिल्ली | कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानात आयोजित भाजपच्या महासभेत अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी चांगलीच डायलॉगबाजी केली.
मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल, असं ते म्हणाले. यावर ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकेकाळी भाजपत असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना खोचक सल्ला दिला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे. मात्र पहिल्याच रॅलीत साप, विंचू, कोब्रा अशी तीव्र भाषा वापरायला नको होतं. मिथुन हे माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही अनेक अनेक सिनेमात सोबत काम केलं. त्यांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. मात्र पहिल्याच रॅलीत त्यांनी साप, विंचू आणि कोब्रा अशा भाषेचा वापर केला. सभेत राजकीय मुद्दे मांडले असले तर बरं झालं असतं, अशी बोचरी टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी या मजबूत आहेत. त्यांना हलवणं एवढं सोपं होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीज महत्त्वाचे मुद्दे मांडले नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला असता तर आणखी चांगलं झालं असतं, असा टोलाही शत्रुघ्न सिन्हा यांनी मिथुन चर्क्रवर्तींना लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल
“…तर महाराष्ट्राची जनता काय आदर्श घेणार?, विरोधकांनी विचार करायला हवा”
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक
मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला- देवेंद्र फडणवीस
पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण
Comments are closed.