बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनापास गोव्याला चाललेल्या पृथ्वीला पोलिसांनी पकडलं, पाहा पुढे काय घडलं!

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत.  या निर्बधांमध्ये भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विनापास गोव्याला निघाला होता. मात्र त्याला आंबोली येथे पोलिसांनी रोखलं, पास दाखवण्यास सांगितला आणि त्यानंतर काही वेळासाठी गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

पृथ्वी शॉ हा मित्रासोबत मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याकडे जाण्यास निघाला होता. त्याची कार बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी पृथ्वी शॉला पोलिसांनी पासची मागणी केली आणि पास असेल तरच पुढे जा, असं सांगितलं. पासची मागितल्यावर पृथ्वीने नाही असं सांगितलं. पास नसल्यामुळे पोलिसांनी त्याला जावू दिलं नाही. यादरम्यान त्याने पोलिसांना विनंती केली मात्र पोलीस कर्तव्यापासून विचलीत झाले नाहीत.

पोलीस आपल्याला काही सोडणार नाहीत हे पृथ्वीच्या लक्षात आल्यावर त्याने ऑनलाईन पाससाठी अर्ज केला. त्यानंतर तासाभराने त्याला त्याचा पास मिळाला आणि पास येईपर्यंत तो आपल्या गाडीतच बसला. मग पास आल्यानंतर पुढील दिशेने मार्गस्थ झाला. मात्र त्याला रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक होत आहे. सेलिब्रिटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या खेळाडूला त्यांनी सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे नियमांचं पालन करण्यास सांगितलं.

दरम्यान, आमच्यासाठी कायदा महत्वाचा आहे. कायदा रस्त्यावरील प्रत्येक माणसासाठी सारखाच आहे. सेलिब्रेटीला वेगळा नियम आणि सामान्य माणसाला वेगळा नियम असू शकत नाही. त्यामुळेच विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वीला रोखलं, असं पृथ्वीला रोखणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश जाधव म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवणं पूनावालांना फायद्याचं की तोट्याचं?; पूनावाला म्हणाले…

गडकरींची कमाल! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

लग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण

महत्त्वाची बातमी! लसीच्या दोन डोसमध्ये असावं इतक्या दिवसांचं अंतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More