नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!
भोपाळ | प्रेम आंधळं असतं, अशी म्हण आहे आणि प्रेमात पडलेला व्यक्ती काहीही करतो हे ही आपण ऐकुन आहोत. असाच काहीसा प्रत्यय मध्यप्रदेशातील एका कुटुंबाला आला आहे. मध्य-प्रदेशातील भिंड जिल्ह्यात प्रेमात आडकाठी बनणाऱ्या 9 सदस्यांना जेवणातुन विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकिस आली आहे.
आपल्या नणंदेच्या नवऱ्याच्याच प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने सासरच्या मंडळींनी प्रेमाला विरोध केल्याने त्यांना जिव मारण्याचा प्रयत्न करून प्रियकरासोबत तिथुन पळ काढला. रेश्मा असं या आरोपी महिलेचं नाव असून तिचं लोहकन खान या नणंदेच्या नवऱ्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. पण सासरच्यांनी याला कडाडुन विरोध केला होता.
रेश्माच्या पतीचं निधन झाल्यानंतर तिचा विवाह लहान दिराशी लाऊन देण्यात आला त्यानंतर, तिचं सुत नणंदेच्या नवऱ्याशी जुळलं आणि हे सर्व प्रकरण सासरच्या मंडळींना कळलं. सासरच्या मंडळींनी याला विरोध केल्यानंतर रेश्मा आणि लोहकन खान यांनी त्यांचा काटा काढायचा आणि पळुन जायचा निर्णय घेतला.
रेश्माने जेवणात विष कालवुन कुटुंबातील 9 जणांना ते जेवण दिलं आणि ती लोहकन सोबत पळुन गेली, बराच वेळ झाला पण घरातुन काही हालचाली दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज दिला, पण कोणीही प्रतिसाद देत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं तर सर्व बेशुद्ध अवस्थेत असल्याचं आढळुन आलं. त्यानंतर ताबडतोब त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि त्या सर्वांना तात्काळ रूग्णालयात हलवलं. दरम्यान सर्व कुटुंबियांवर ग्वाल्हेर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली कोरोनाची लस; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन
पोलिसाची शेतकऱ्याला शेतात जाऊन बेदम मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ
कोरोना लसीसंदर्भात गुडन्यूज, सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, ‘या’ वयोगटात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ
महाविकास आघाडी सरकारचा छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा दणका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.