बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

रायगड | दरड कोसळ्याने महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात जिवित तसेच वित्तहाणी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये हे संपूर्ण गाव दरड कोसळल्यानं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं आहे. या गावातील जवळपास 35 कुटुंबं जमीनदोस्त झाली आहेत. मात्र, या गावातील एका माऊलीने आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या तिन्ही मुलांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं आहे.

या माऊलीचे नाव शेवंता नंदू कोंडाळकर असं आहे. शेवंता यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. या तिन्ही मुलांच्या अंगावर एकदा नाही तर चारवेळा दरडीचा काही भाग कोसळला. परंतु शेवंता यांनी चिखलभर पाण्यातून रस्ता काढत आपल्या मुलांचे प्राण वाचवले. संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या भयानक घटनेचं हे संपूर्ण कुटुंब साक्षीदार आहे.

त्या दिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास अचानक डोंगर खचला. बघता बघता वाडीतली सर्व घरं मातीखाली जात होती. प्रत्येकजण आपले प्राण वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडत होता. शेवंता यांच्यासह त्यांची मुले देखील या दलदलीत अडकली होती. या भयानक प्रसंगी आपल्या मुलांचा हात सटकू नये म्हणून शेवंता यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या शर्टला पकडले आणि दलदलीतून खेचत त्यांना बाहेर काढले.

काजल, अक्षता आणि परम अशी या मुलांची नावे आहेत. दरम्यान, या कठीण प्रसंगी काहीजण आपले प्राण वाचवण्यासाठी याचना करत होते. मात्र, आपण देखील परिस्थितीसमोर हतबल असल्याची खंत आपल्या मनात असल्याचं शेवंता यांनी बोलून दाखवली आहे.

थोडक्यात बातम्या –

“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”

“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”

…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’

पूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…

मोठी बातमी! राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More